माझ्या कवितेची उत्पत्ती
माझ्या भावना मी कागदावर मांडत असतो
कवितेच्या माध्यमातून त्या
तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो
करू नका थट्टा माझ्या भावनांची
त्यातूनच तर आहे किंमत माझ्या अस्तित्वाची
विचार तर नेहमी मनात खूप सारे येतात
पण ते लिहावेत कुठेतरी हे नेमक येत नाही लक्षात
सांगायला तर माझ्याजवळ खूप काही असत
पण वेळप्रसंगी ते ऐकून घ्यायला
कुणीच जवळ नसत
अशा वेळी मी फ़क्त कवितेचाच आधार घेतो
तिच्यातच मग माझे सर्व विचार उतरवतो
ती देखील म्हणते मग "का रे सर्व काही मलाच सांगतोस?"
त्यावर मग मी उत्तरतो
"वेडे तूच आहेस एकटी जिला मी या जगात आपलस मानतो"